औरंगाबाद - पीडित महिला ही 30 वर्षीय विवाहित असून पेशाने शिक्षीका आहे. शिक्षक असलेल्या अन्सारी यांच्या सोबत त्यांचे लग्न ठरले. शहरातील एका फंक्शन हॉल मध्ये ४ डिसेंम्बर 2015 रोजी मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर पती ने अनेक महिने विवाहितेशी संबंध ठेवले नाही. विवाहिता ने देखील अनेक वेळा संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले मात्र पती नकार देत असे. कालांतराने पत्नी संबंध ठेवण्याचा तगादा लावत असल्याने पती ने विवाहितेस मारहाण करण्यास सुरुवात केली. माहेरून पंधरा लाख आणायचा विवाहितेकडे तगादा लावला. मागणी पूर्ण न करू शकल्याने विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात येत असे.ही बाब पीडित विवाहितेने माहेरच्या मंडळींना सांगितली. विवाहितेने पती नपुंसक असल्याची लग्नानंतर सुमारे तीन वर्षांनंतर तक्रार पत्नीने जिन्सी पोलीस ठाण्यात केली आहे.
या प्रकरणी सासरच्या आठ जाणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षक पतीची वैधकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहम्मद असिफोद्दीन अन्सारी, मोहम्मद हबीबोद्दीन, अझरोद्दीन अन्सारी, अजिजोद्दीन, मेहराज अन्सारी, गौसोद्दीन अन्सारी सह 2 महिला (सर्व राहणार तारबुल हकनगर, दर्गारोड परभणी)अशा सासरच्या आठ जाणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत तपास अधिकारी उपनिरीक्षक तायडे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पतीची वैधकीय तपासणी केल्या नंतर सत्त्याता समोर येईल असे उपनीरीक्षक तायडे यांनी सांगितले